पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात अनेक मातब्बर बांधकाम व्यवसायिकांनी आपले प्रस्थान बसवले आहे. गुरुवारी शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने छापे घातले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली.
या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बांधकाम व्यवसायिकांच्या पिंपळे सौदागर, पिंपरी कम्प, आणि पुण्यातील पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकली नाही.




