पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्य पोलीस फौजदार, सहाय्यक पोलीस फौजदार, अशा ७ कर्मचा- यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त यांनी काढले.
१) शंकर वामनराव अवताडे यांची पिंपरी पोलीस स्टेशन येथून पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट- ०४ येथे बदली करण्यात आली आहे.
२) राम सिद्राम राजमाने यांची बावधन वाहतुक विभाग येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.
३) गणेश साहेबराव जवादवाड यांची तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.
४) सत्यवान बाजीराव माने यांची वाकड पोलीस स्टेशन येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.
५) संतोष बळीराम पाटील यांची वाकड पोलीस स्टेशन येथून पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ०१ येथे बदली करण्यात आली आहे.
६) अनिल आत्माराम देवडे यांची चाकण पोलीस स्टेशन येथून पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन, गुन्हे येथे बदली करण्यात आले आहे.
७) किशोर ढोमण पाटील यांची महाळुंगे पोलीस स्टेशन येथून पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे गुन्हे येथे बदली करण्यात आले आहे.




