पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांनी आज भेट दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी या नाट्यगृहाची विस्तृत माहिती त्यांना दिली.
यशदाच्या वतीने ताथवडे येथे सांस्कृतिक सभागृह (Tathwade) उभारण्याचे प्रयोजन आहे. भवन उभारताना इतर सांकृतिक भवनांची माहिती घेऊन परिपूर्ण सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे विचारधीन असल्याचे यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे,बाळासाहेब गलबले, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे उपस्थित होते.




