पिंपरी – डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे बालरोग विभागाच्यावतीने जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्ताने जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जे आई वडीलां पासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जनजागृती तसेच या आजारांच्या उपचार पद्धतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश आहे.
थॅलेसीमिया आजार कसा होतो, त्यांची लक्षणे कोणती, त्यावर उपचार काय आहेत, या आजाराचे प्रकार, पथ्ये, आहार, दिनचर्या, काळजी कशी घ्यावी, अस्थी मज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) आदी विषयक माहिती देण्यात आली.




