वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खून प्रकरणाची चर्चा विजली नसताना आज तळेगावचे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगावात दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून कोयत्याने वार करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्राणज्योत मालवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. त्यांच्यावर झालेला हल्ला अतिशय भयानक होता त्यामुळे त्यांना तातडीने सहमटणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र दवाखान्यात गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरने मृत घोषित केले होते अशी माहिती समोर येत आहे.




