वडगाव मावळ :- माझ्यावर हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर तुम्ही सगळे प्रेमापोटी आलात. मावळतील सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते सांगत आहेत की, सुनिल शेळके आमच्यासाठी काम करू शकतो मात्र कोणाच्या जीवावर उठू शकत नाही. आज माझ्यासाठी एवढी जनता रस्त्यावर उतरली हीच माझ्या कामाची पावती आहे.
राजकारणात विरोधक संधी शोधत असतात आणि संधी जिथे मिळेल तेथे फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. आमदार झाल्यापासून मागील साडेतीन वर्षात काम करत असताना माझ्या व्यावसायाची व कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. चौकशी मधून मला कोर्टा पर्यंत खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीमत्ता चांगली ठेऊन चांगल काम केल्याने त्याचे फळ आज देखील मला मिळते आहे. जो पर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तो पर्यंत मी व माझा परिवार तुमच्यासाठी काम करून तुमच्याशी प्रामाणिक राहील.
किशोर आवारे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात माझे व माझ्या भावाचे नाव सुढबुधिने मला कुठेतरी अडकविण्यासाठी असे राजकारण जाणीवपूर्वक केले जात आहे. या घटनेमागे कोण कटकारस्थान करतय हे जनतेला माहिती आहे. पोलिसांच्या तपासानंतर सर्व समोर येईल. मात्र एखाद्या कुटुंबावर आघात झाल्यावर आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी उभ राहील पाहिजे. पण त्या कुटुंबाला भडकवून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जात आहे.
किशोर आवारे यांनी देखील माझ्यासाठी काम केले आमचे मतभेद असतील आम्ही राजकारणात एकमेकांवर टीका करू पण कोणाच्या जीवावर बेतेल असे राजकारण करण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही. मी राजकारणात असो वा नसो कधीचं चुकीचं काम करणार नाही . पोलीसांनी जरी माझे गुन्ह्यात नाव घेतले असले तरी कोणी त्या मातेला भडकवून माझे नाव घ्यायला लावले हे ज्या दिवशी पोलिसांचा तपास संपेल त्या दिवशी सर्व बाबी समोर येतील असे वक्तव्य आमदार शेळके यांनी केले. आमदार सुनिल शेळके यांच्या समर्थकांनी रविवारी (दि.१४) तळेगाव येथे काढलेल्या मोर्चात बोलत होते.
तळेगाव येथील जनविकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आमदार सुनिल शेळके व त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे नाव घेतल्याने आमदार शेळके यांच्या समर्थकांनी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ रविवारी तळेगाव येथील मारुती चौक ते आमदार शेळके यांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात आमदार समर्थक ,पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, एसआरपीचे अध्यक्ष रमेश साळवे, माचींद्र खराडे, आशिष ठोंबरे, रुपाली दाभाडे, मंजुश्री वाघ यांनी वक्तव्य करत निषेध व्यक्त केला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.




