पिंपरी : नेहमी मंत्री आले की रस्त्यावरील सर्व वाहतूक हटवली येते. तर आज पिंपरी चिंचवडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा दौरा होता. त्यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या ताफ्याला वाट करून देण्यासाठी काही काळासाठी नाशिक फाटा येथे वाहतूक थोपून ठेवल्यामुळे नाशिक ते दापोडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे राजकीय नेत्यांसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार चुकीचा आहे असा सूर नागरिकांमधून उमटताना दिसून आला.
आज पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता. शहरात अनेक भागात कार्यक्रम असल्यामुळे ठीक ठिकाणी पोलीस संरक्षण लावण्यात आले होते. तर अनेक चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताना व जाताना वाहतूक पोलिसाकडून वाहने थांबवली जात होते. याचा सर्वाधिक फटका आज नाशिक उड्डाणपुलाखाली वाहन चालकांना बसला. नाशिक फाटा ते दापोडी पर्यंत वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.




