तळेगाव दाभाडे दि. १५ ( वार्ताहर) : जुना मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिर ते सोमाटणे येथील काळोखे पेट्रोल पंप या दरम्यान रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) आज (दि १६) ते गुरुवार (दि. १८) महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली असल्याने या कालावधीमध्ये महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असल्याचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले.
अतिक्रमणाची कारवाई करताना बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते, यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने होते अथवा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ शकते यावर उपाय म्हणून जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी १६ ते १८ मे दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.
■ पुलावरील बंगळूर ते मुंबईकडे जाणारी वाहने सेंट्रल चौक मार्गाऐवजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानि मुंबईकडे जातील
■ सोमाटणे फाटा येथून सोमाटणे फाटा एक्झिट रोडने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुढे इच्छित स्थळी जातील
■ जुना पुणे-मुंबई महामागनि मुंबईकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौक, कृष्णा चौक मार्गे द्रुतगती मार्गाने मुंबई जातील.
■ पुणे ते सोमाटणे व तळेगाव दाभाडेकडे जाणारी वाहने निगडीमार्गे सेंट्रल चौक- गहुंजे शिरगावमार्गे सोमाटणे व तळेगाव इच्छित स्थळी
बंगळूर महामार्गाने येणारी वाहने किवळे मार्गे कृष्णा चौक- गहुंजे शिरगाव- सोमाटणेमार्गे मुंबईकडे वा इच्छित स्थळी जातील दुचाकी व मोटारींसाठी
■ मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी वडगाव फाटा- तळेगाव स्टेशन चौक- माळवाडी- मंगलमूर्ती मेडिकल- भेगडेवाडी स्टेशन- घोरावडेश्वर मार्गे महामार्गा
■ पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी सेंट्रल चौक- साईनगर- गहुंजे-शिरगाव मार्गे- सोमाटणे फाटा मार्गे पुढे
■ उर्सेखिंड येथून येणारी वाहतूक वडगाव फाटा चौकातून उजवीकडे वळून पुण्याकडे जाणारा मार्ग व जुना महामार्गाने येणारी वाहतूक वडगाव फाटा चौकात बंद
■ तळेगाव दाभाडे (लिंब फाटा) ते पुणे बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद पर्यायी मार्ग
■ तळेगाव-चाकण रस्त्याने पुण्याकडे जाणारी हलकी वाहने माळवाडी- घोरावाडी- देहूरोड मार्गे पुण्याकडे जातील
■ तळेगाव-चाकण रस्त्याने पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने देहूफाटा- येलवाडी- परंडवाल चौक- देहूगाव मार्गे जातील.




