देहुगाव ( वार्ताहर) श्री. संत तुकाराम महाराज आषाढी वारी ३३८ वा पालखी सोहळ्याच्या पार्श्र्वभूमिवर देहुगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अतिरिक्त ५२ कर्मचाऱ्याची नियुक्ति करण्यात आली आहे.या काळात प्राथमिक आरोग्य केन्द्रासह तीन ठिकाणी प्राथिमिक उपचार केंद्र ( बाहयरूग्ण तपासणी ) असणार आहेत. पुरेशा औषध साठा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
वैद्यकीय अधिकारी -२ , आरोग्य अधिकारी -११ , आरोग्य सहाय्यक -६ ,आरोग्य सेवक -१३ , आरोग्य सेविका -११, पुरुष परिचर -३ ,रुग्ण वाहिका-५ आणि ओषधोपचार पथके ३ ,मुख्य मंदिर , वैकुंठस्थान मंदिर आणि गाथा मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असे चार ठिकाणी बाह्य रुग्ण तपासणी केंद्र असणार असून पुरेषा प्रमाणात ओषध साठा करण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयात १० टक्के खाटा राखीव
देहुत दहा रुग्णालय असून , या पैकी ७ रुग्णालया मध्ये वारकरी भाविक भक्तांच्यासाठी १० टक्के बीड राखीव ठेवण्या बाबत लेखी पत्र देण्यात आले आहेत.
पाणी भरणा केंद्र : पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा टैंकरने करण्यात आली आहे. देहू परिसरासह पालखी मार्गावरही टँकर उपलब्ध असणार आहेत.
हॉटेल चालकांना सूचना
देहुगाव मध्ये अनेक हॉटेल्स आहेत. सर्व हॉटेलमध्ये यात्रा काळात ,स्वछता ,शुद्धता राखणे आणि सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही तपासणी करण्यात येणार आहे.
देहू कार्यक्षेत्रात एकूण १५ जलसेवा केंद्र आहेत.या सर्व जल सेवा केन्द्राच्या पाण्याचे नमूने तपासणी साठी पाठविण्यात आले होते.त्यामध्ये ४ जलसेवा केन्द्राचा अहवाल दुषित पाणी असल्याचा प्राप्त झाला आहे.संबधित जलसेवा केंद्र चालकांनी त्वरित शुद्धिकरण करून घ्यावे अन्यथा अशा जेल सेवा केन्द्राना सील करण्याय येईल.
प्रमाणित केलेला बर्फ वापरवा
पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान अनेक ठिकाणी रसवंती गृह, शितपेय, ज्युस सेंटर हॉटेंल्स मध्ये बर्फाचा वापर केला जातो. सेवाभावी संस्थांकडून लिंबू शरबत वाटप करण्यात येते करतात.अप्रमाणित बर्फामुळे जुलाब उल्ट्याचा आजार होवू शकतात.त्यासाठी प्रत्येकाने प्रमाणित बर्फाचा वापर करावा आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा ओटीपी तपासावा तसेच परवानगी घ्यावी.
यात्रा काळात बिसलेरिच्या बनावट बाटल्या पासुन सावधान
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी अनेक दुकानदार टपऱ्या दुकानदार मिनरल पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवत असतात.त्या नामवंत कंपण्याच्या आणि प्रमाणित केलेल्या ठेवण्याचे बंधनकारक आहेत अन्यथा कारवाई करण्यात येईल.
यात्रा काळात व इतर वेळी पाणी साठा करु नये. साठवलेल्या पाण्यामुळे मलेरिया,डेंगू सारखे आजार जोडू नये .डासांची उतपत्ती रोखण्यास आळा बसेल. गत महिन्यात काही भागांमध्ये डेंगू चे रुग्ण आढळून आले आहेत.
.डॉ. किशोर यादव
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक अरोग्य केंद्र देहू




