पिंपरी : भरदिवसा गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या किटक टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई करून टोळीतील गुन्हेगारांची तळेगाव दाभाडे येथे धिंड काढली. त्यामुळे मावळातील गुन्हेगारांची तंतरली आहे.
किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय १९), वैभव राजाराम विटे (२५, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (२०, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (२०, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (२०, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किटक याने साथीदारांसह तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. फिर्यादी महिलेला मारहाण करून विनयभंग केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत केली.




