पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात काल झालेल्या पावसामुळे वीस पुरवठा विस्कळीत झाला होता. याचा फटका रावेत पम्पिंग स्टेशन येथे बसला. रावेत येथील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे पुरवठा होणाऱ्या काही टाक्या भरल्या नाहीत. म्हणून आज पाणीपुरवठा होणाऱ्या भागात खूप कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना या काही नवीन नाहीत. कधी पंपिंग स्टेशनचा काम सुरू असते, तर कधी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा. त्यातच आता वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्या पाठोपाठ आता पाणीपुरवठा ही विस्कळीत होणार आहे. त्यामुळे याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.




