मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध करण्यात आला. या वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईट्सवर कारवाई व्हायला हवी. त्यासंदर्भातील मागणी आज @NCPspeaks च्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे. pic.twitter.com/L6WYV3aFI3
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 31, 2023
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना निवेदन दिले. त्यावर संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन फणसाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले.



