देहूरोड : मावळ तालुक्यात दोन राजकीय हत्या ताज्या असताना आज पुन्हा एकदा सासरवाडीला आलेल्या जावयाची निर्गुणपणे हत्या झालेले आहे. मावळ तालुक्यातील सासरवाडीला आलेल्या जावयाचा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करत खून केला. ही घटना रविवारी (दि. 4) मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली
गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी सूरज काळभोर यांचा मागील दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सूरज काळभोर सासरी आले होते. रविवारी सकाळी शेतात फिरायला गेले. असता तिथे तीन ते चार जणांची सूरज यांना गाठले त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला.
हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.




