वडगाव मावळ (प्रतिनिधी) रविवारी मावळमध्ये सासरी आलेल्या जावयाचीच हत्या घडल्याची घटना होती सुरुवातीला चोरीच्या प्रकरणातून खून झाल्याचा संशय होता. मात्र, तपासानंतर पत्नीनेच पतीच्या डोक्यात टिकावाने घाव करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचुन खून केल्याची माहिती समोर आली. सुरज राजेंद्र काळभोर वय 30 रा. आकुर्डी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी पत्नी अंकिता हिला सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील व महिला पोलीस अंमलदार पूनम शिंदे यांनी वडगाव मावळ न्यायालय न्यायाधीश कातकर यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या सखोल तपास करण्यासाठी शुक्रवार (दि.9) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ही घटना रविवारी (दि.4) दुपारी 2:30 बी. के बिर्ला स्कुलजवळ गहूंजे ता. मावळ जि पुणे हद्दीत घडली. कल्पना राजेंद्र काळभोर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यामुळे सुरुवातीला खून लपविण्यासाठी अपघात व दरोड्यांच्या उद्देशाने हल्ला अस बनाव केला होता. पण सत्य अखेर बाहेर आले. याप्रकरणी अंकिता सुरज काळभोर (वय 28) आरोपी पत्नीला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुरज काळभोर व अंकिता संतोष बोडके यांचे 27/04/23 रोजी लग्न झाले. 25 मे रोजी अंकिता ही भावजयीच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाला गहूंजे येथे माहेरी गेली. 2 जूनला पुन्हा आकुर्डी येथे आली. रविवारी (दि.4) दुपारी 12 वा. आकुर्डी येथून दोघे दुचाकीवरून प्रति शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी शिरगाव येथे आले होते. वडिलांचे शेत दाखविते असे बोलून दोघेजण शेतात गेले. तेव्हा आकुर्डी परिसरात पाऊस असल्याने फिर्यादी कल्पना काळभोर यांनी मयत मुलगा सुरज याला फोन करून चौकशी केली. तेव्हा सुरज म्हणाला दुपारचे जेवण करण्यासाठी येणार आहे. फ्लॉवरची भाजी कर असे सांगितले. त्यानंतर आरोपी पत्नी अंकिता हिने पती सुरजच्या डोक्यात टिकावाने घाव करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचुन खून केला.
मयत सुरजच्या आईला अपघात झाला असे सांगितले त्यानंतर लघुशंका करण्यासाठी गेले असता, दरोड्यांच्या उद्देशाने अनोळखी चौघांनी हल्ला केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व पोलीस उप निरीक्षक नारायण पाटील तसेच पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी ‘धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. तपासाची सूत्रे फिरवली असता, पतीचा खून हा पत्नीने इतर साथीदारांच्या साहाय्याने केल्याचे स्पष्ट झाले असून आरोपी पत्नी अंकिता काळभोर हिला अटक केली आहे. या खुनातील साथीदारांना लवकरच ताब्यात घेण्याचा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला.




