पिंपरी: देशी बनावटीचे दोन पिस्टल, एक गावठी कट्टा व चार जीवंत काडतूसे बाळगणारा पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीसांचे रेकॉर्डवरील सराईत आरोपीस पिंपरी पोलीसांनी केली अटक केली.
दिनांक १०/०६/२०२३ रोजी पोलीस उप निरीक्षक शाकिर जिनेडी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील आरोपी रियाज कोरबु, रा. ओटास्कीम, निगडी, पुणे हा त्याचे लाल रंगाचे बलेनो कारमधून सायंकाळी १८.३० वा. चे सुमारास काटेपिंपळे रोड, ब्रीजजवळ, पिंपरीगाव, पुणे येथे कोणालातरी पिस्टल देण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळताच पोउनि जिनेडी यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक साो, पिंपरी पोलीस ठाणे यांना माहिती दिली असता, त्यांनी कारवाई करण्याचे मुफजल आदेश दिल्याने पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री. सावर्डे, पोलीस उप निरीक्षक जिनेडी, सपोफी भांडवलकर, पो.हवा. ६८४ हांडे, पो.हवा. ११८२ बारशिंगे, पो.ना. १२२२ वागसिराज, पो.ना. १७६२ करपे, पो.ना. १७६१ महाडिक, पो.शि. २९४८ शेख, पो.शि. २६५७ रेड्डी, पो.शि. २७२२ जानराव, पो.शि. ढवळे यांचेसह बातमीचे ठिकाणी जाऊन दोन टीम तयार करून सापळा रचून थांबले. यावेळी बातमीदाराने दिलेल्या माहिती प्रमाणे एक लाल रंगाची मारूती सुझुकी बलेनो कार नं. एमएच १४ जीएस ४४४१ ही काटेपिंपळे कडून पिंपरीगावचे दिशेने आली. सदर कारमध्ये असलेला चालक हा कोणालातरी पाहत असल्याचे दिसून आल्याने, बातमी प्रमाणे खात्री होताच वरील नमूद स्टाफने शिताफीने सदर कार चालकास ताब्यात घेवून त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रियाज मेहबुब कोरबु, वय ३२ वर्षे, रा. उरवेला हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं. ५, रूम नं. २०३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आझाद चौक, ओटास्कीम, निगडी, पुणे असे असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सदर इसमाची व त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली. त्याचे ताव्यातील कारचे डिक्कीचे मॅटखाली स्टेपनीमध्ये एक पांढऱ्या रंगाची प्लॅस्टीक बॅग व त्यात एकूण ०३ अग्निशस्त्रे, त्यापैकी ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०१ गावठी कट्टा व त्यांचे मॅगझिन / चेंबरमध्ये एकूण ०४ जिवंत काडतुसे (राऊंड) असे कारसह मिळून आल्याने एकूण ८,१७,५००/- रूपये किंमतीचा माल त्याचे ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.
सदर बाबत पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रं. ६२७/२०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीस दाखल गुन्ह्याचेकामी दिनांक १०/०६/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
विनय चौबे पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड, विवेक पाटील पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ १ पिंपरी चिंचवड, मा. श्रीमती सतीश कसबे सहाय्यक पोलीस आयुक्त सो पिंपरी विभाग पिंपरी चिंचवड, राम राजमाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्रीमती रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिरूध्द सावर्डे, शाकिर जिनेडी, सपोफी प्रमोद भांडवलकर, पो.हवा, राजेंद्र बारशिंगे, पो.हवा. शांताराम हांडे, पो.ना. जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, विष्णू भारती, ओंकार बंड, मपोना भाग्यश्री जमदाडे, पो.शि. मोहसिन शेख, विजय जानराव, विकास रेड्डी, समीर ढवळे व दत्ताजी कवठेकर यांनी केली आहे.




