पिंपळे सौदागर : दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र देहू व आळंदी येथुन पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या प्रथमोपचारासाठी सेवा पुरवली जाते. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पूजा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.




