पिंपरी, दि.14 (प्रतिनिधी) तीन वर्षांची चिमुरडी रडत असल्याच्या कारणावरून सावत्र बापाने तिला भिंतीवर आपटले. यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १२) देहूरोड ठाण्यातील चिंचोली येथे घडला आहे. याप्रकऱणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महादेव नारायण गायकवाड (२२, रा. चिंचोली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव याची सावत्र मुलगी गुड्डी (वय ३ वर्ष) रडत होती. याचा राग आल्याने आरोपीने मुलीच्या पोटात लाथा- बुक्क्यांनी मारहाण करीत तिला उचलून भिंतीवर आपटले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहुरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.




