पिंपळे सौदागर; आज दि. २१ जुन २०२३ रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत नाना काटे सोशल फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पी..सी.एम.सी.ग्राउंड पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शरीर व मन सुदृढ ठेवायचं असेल तर शारीरिक व्यायामा बरोबरच योगासन करणेही आवश्यक आहे.योगा हे भारतीयांनी जगाला आरोग्यासाठी दिलेली भेट आहे असे मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मत व्यक्त केले.
या शिबिराला आर्ट ऑफ लिव्हिंगचे शशांक खांडेकर, शशिकांत बोरगावकर, कुणाल पंडय़ा, यतीन भंडारी, सेन्थिल कुमार, श्रेया देशमुख, निशा लुल्ला, कांचन बोरगावकर, युवा नेते शाम जगताप,श्री. चंद्रकांत तापकीर, काळूराम कवितके,सोसायटी सभासद राजेश पाटील, रवि मुंढे, सचिन देसाई, कैलास टिळे, सतिश डोंगरे, दिपक काळे तसेच उमेश काटे, बाळासाहेब कुंजीर, विशाल भालेराव, पै. सुमित डोळस, अभिजीत काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, मच्छिंद्र काटे तसेच सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



