पिंपळे सौदागर (पुणे) :- पिंपळे सौदागर येथील वै. ह.भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे.
यावेळी माजी नगरसेविका मा.सौ. निर्मलाताई कुटे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या मा. सौ. धनश्री सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व सांगितले. केतकी मामर्डे यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतले. तसेच विविध प्रकारचे योग प्रकार संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी करून दाखवत योग दिनाचे महत्व पटवून दिले.
योग दिनानिमित्त इयत्ता १० वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत तांबडे, योगिता नाशिककर व नम्रता पटेल यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार मोनिका काटे यांनी मानले.




