पिंपळे सौदागर : आज बुधवार दि.२१ जुन २०२३ रोजी ” आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमित्त सकाळी ७ ते ८.३० यावेळेत शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, गोविंद-यशदा चौक , पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन मा. नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन, द आर्ट ऑफ लिविंग , ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, मीडिया पार्टनर रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ FM यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले .
यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या ठेक्यावर योगाचे अनेक प्रकार नागरिकाकडून करून घेतले तसेच “योग करण्याची पद्धती व याचे महत्व” उपस्थितांना समजावून सांगितले.
यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बी.के.वर्षा दीदी यांनी सांगितले कि “भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे आपले शरीर व मन निरोगी ठेवले जाते. योगामध्ये अनेक असाध्य रोग बरे करण्याची अद्भुत क्षमता आहे. योग केवळ व्यायाम नाही तर तो शरीर व मन एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो तसेच ध्यान साधना करून मनशांतीची प्राप्ती होते.
तसेच यावेळी आर्यन्स मार्शल आर्टस् इंडिया या क्लासचे काही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा जिंकून त्यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेस निवड झाल्याबद्दल त्यांचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी मुख्य कोच परवेज शेख उपस्थित होते.
यावेळी या योग शिबिरास लहान मुले , स्त्रिया तसेच जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला . साधारण ५०० नागरिकांनी या योग शिबिरास उपस्थिती नोंदवली तसेच उपस्थित मान्यवरांना तुळसचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सत्यजित भैया चड्डा ,बी. के. वर्षा दीदी , उद्योजक वसंत काटे, इंटक अध्यक्ष कैलास कुंजीर, उद्योजक भरत काटे, आनंद हास्य क्लब सदस्य, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन मेंबर्स , नवचैतन्य हास्य क्लब मेंबर्स, श्रीमती मृणाल देशपांडे, आर.जे तेजस्विनी,आर.जे प्रशांत, राजेश पाटील, गणेश झिंजुर्डे , प्रविण कुंजीर, मनोज ब्राह्मणकर , दिपक गांगुर्डे, समीर देवरे, बाळकृष्ण परघळे आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले




