मुंबई : विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, मग पक्ष कसा चालतो हे दाखवतो, पक्ष संघटनेत कुठलेही पद द्या, त्या पदाला न्याय देऊन दाखवतो, असे वक्तव्य करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर आपली नजर असल्याचे संकेत दिले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यात बोलत होते.
25 व्या वर्षांत पाय ठेवत आहे. मात्र, पक्ष विदर्भात आणि मुंबईत कमी पडतो आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. तर अजूनही आपला मुंबईत अध्यक्ष नाही आपल्याला निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही म्हणत ज्येष्ठ नेत्यांनाही टोला लगावला आहे. दरम्यान मुंबईमध्ये बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यावर राज्यात होणाऱ्या दंगली, गुंडांकडून होणारे गाड्याचे नुकसान यासह जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न अशा अनेक विषयावर हल्लाबोल केला आहे.
- नुस्ती दाढी कुरवाळता, काम केली की कौतुक करेन : अजित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. नुस्ती दाढी कुरवाळता, कामे केली की कौतुक करेन, असे टीकास्त्र अजित पवारांनी शिंदेंवर सोडले. एकनाथ शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. तुम्ही काम करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसतात. काम करा मी कौतुक करेल. गुवाहाटी गोवा फिरुन आलात ते असले धंदे करायला आलात का? असा सवालही उपस्थित केला.



