पिंपरी : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराप्रमाणे भाजपच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष नियुक्त्याही रखडल्या आहेत. भाजपकडून ‘मोदी @9’ या देशव्यापी मोहिमेमुळे या नेमणुका रखडल्याचे कारण देण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका उमेदवार मीच ठरवणार असे ठणकवताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना दिला आहे. नेहमीच चिंचवड व भोसरीकडे शहराचे शहराध्यक्ष पद देण्यात येते. पालिका प्रशासनाचे पिंपरी विधानसभेतील कार्यकर्त्यांना नेहमी दुय्यम वागणूक देण्यात येते. आता शहरात शहराध्यक्ष पद निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष पिंपरी विधानसभेत शहराध्यक्ष पद देऊन न्याय देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे पिंपरी- चिंचवड निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी शहरातील सामान्य कार्यकर्त्यांसह शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक यांच्या भावना जाणून घेतल्या. याचा सविस्तर अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला आहे. विद्यमान अध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे शिरूर लोकसभा प्रचार प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपमध्ये “एक व्यक्ती एक पद” हा नियम आखून ठेवला आहे. त्यामुळे आता शिरूर प्रचारक प्रमुख सोबत शहराध्यक्ष पद लांडगे यांच्याकडे ठेवायचे का? त्यांनाच किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कायम ठेवायचे, यावर भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. त्यावर एकमत न झाल्याने हा निर्णय आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार आहेत. पिंपरी महानगरपालिकेची दरवाजे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उघडतात. त्यामुळे चिंचवड विधानसभेतील इच्छुक शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी निवड पुन्हा चिंचवडला लक्ष करणार की भोसरी चिंचवडच्या शर्यतीत पिंपरी विधानसभेतील कार्यकर्ते नेहमीप्रमाणेच उपेक्षित राहणार हेच पहावे लागणार आहे.




