पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे ।
वेदांनाही न कळणारा, तपस्वी, योगी यांनाही दुर्लभ असणारा भगवान परमात्मा उभा उभी भेटण्याचे ठिकाण म्हणजे भूवैकुंठ पंढरी. त्यासाठी साधी सोपी साधना म्हणजे संतांच्या सोबत केली जाणारी वारी. संतांच्या पालखीसोबत उन वारा, पाऊस, प्रतिकूल परिस्थिती यांची तमा न बाळगता, देहभान हरपून विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीची वारी ही खरोखर परमानंदाची अनुभुती असते. तो आनंद शब्दातीत आहे,.
पालखीच्या प्रस्थानापासून ते पांडुरंगाच्या दर्शना – पर्यंतचा वारीचा प्रवास ही एक अत्यंत उत्कट, भावनाप्रधान अशी भक्तीची पद्धती आहे. नवविधा भक्तीचे सर्व प्रकार वारीत सहज घडून येत असतात. भगवंताने दिलेला हो दुर्लभ नरदेह, संपूर्णच्या संपूर्ण भगवंतासाठी समर्पित करणे हे वारीत घडत असते. देवाने दिलेले पाय त्याची वाट चालतात, हात त्याच्यासाठी टाळी वाजवतात, मुखाने त्याचेच नाव घेतले जातात. एवढेच नव्हे तर घेतलेला प्रत्येक श्वास आणि सोडलका उच्छवास हा त्यालाच समर्पित असतो. देह-अवस्थेचं विस्मरण होऊन भगवंताशी एकरूप झालेले वारकरी हे खरेखुरे मोक्षाचे अ अधिकारी असतात
नातरी दीपमूळकी । दीपशिखा अनेकीं। मीनालिया अवलोकीं। होय जैसें ॥ अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदे नामार्थ एकाहारीं । मी तूं विण ॥
मूळ महाज्योतीच्या अनेक ज्योती, वारक-यांच्या रुपाने वारीच्या माध्यमातून पुन्हा त्या महातेजामध्ये मिळून जातात. द्वैताची वारी सरून मी, तू पणाचा भेद संपून मूळच्या अद्वैत स्थितीला पोहोचणे म्हणजे वारी आहे. मूलतः आनंदस्वरूप, सुखस्वरूप असणारे वारकरी बारीच्या माध्यमातून त्या परमानंदाला प्राप्त होतात. संत सम्राट ज्ञानोबारायांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी लाईव्ह प्रक्षेपणाचे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने, ह. भ.प. उमेश महाराज बागडे यांच्या सोबत सलग तीन वर्षे निवेदन करताना आम्हाला जो आनंद होतो त्याच्या कित्येक पटीने वारकरी आनंद घेत असतात शक् स याचे आम्ही साक्षीदार आहोत. शब्दांच्या पलीकडची अनुभूती शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.
पंढरीचा वारकरी | वारी चूकों नेदी हरी॥ राम कृष्ण हरी
ह.भ.प. प्रा. दिगंबर महाराज ढोकले 7249163349




