पिंपरी : प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील आरक्षण क्र. ३६१ मधील गार्डनचे आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावा नगरसेवक नाना काटे यांनी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील सर्वे न. २१ मध्ये आरक्षण क्र. ३६१ नुसार गार्डनचे आरक्षण आहे. ते बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल विकसित करण्यात यावा. प्रभागातील सद्य परीस्थीती पाहता पिंपळे सौदागर या प्रभागात महानगरपालिकेच्या वतीने सर्व सोयीसुविधा युक्त अशे ३ गार्डन व २ प्ले ग्राउंड विकसित करण्यात आहेत. तसेच पिंपळे सौदागर परिसरात एकूण २३० व त्यापेक्षा जास्त निवासी सोसायटी आहेत. त्यामधील सर्व नागरिकांना जलतरण तलाव व बॅडमिटंनचा सरावासाठी पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, थेरगाव, किवा खासगी ठिकाणी येथे जावे लागते.
नागरिकांची परवड पाहता पिंपळे सौदागर येथे आता गार्डनची गरज नसल्याने त्याऐवजी इतर सुविधा पुरवली जावी. करदात्यास सोयीसुविधा देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक पिंपळे सौदागर परिसरात जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल बांधावा अशी सातत्याने मागणी रास्त असल्याने याचा विचार करावा. पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉलची सुविधा देणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता पिंपळे सौदागर येथील सर्वे न. २१ मधील आरक्षण क्र. ३६१ गार्डन या आरक्षण बदलाचा निर्णय घेवून येथे सुसज्ज जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




