पिंपरी : पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या वरूण राजाने आगमन केले आहे. आज शनिवारी दिनांक 22 जून रोजीचा दिवस उजाडला आणि सकाळपासूनच संपूर्ण आकाशात ढग जमा झाले होते. दुपारनंतर हळूहळू पावसाला रिमझिम सुरुवात झाली आणि सायंकाळी पावसाचा जोर वाढला. अनेक दिवसातून प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांची पावसाकडे लागलेली प्रतीक्षा अखेर संपली.
शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणाची चिताग्रस्त बनत असताना आज पिंपरी चिंचवडकरांना आनंद होताना दिसत आहे. दरवर्षी सहा ते सात जूनला मान्सून सुरू होतो. मात्र, हवामानातील बदलामुळे मागील काही वर्षापासून मान्सून नक्की कधी सुरू होईल याबाबत शंका आहे. त्यातच मध्यंतरी आलेल्या बिफोरर्जोय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाने दडी मारली होती. यंदाची आषाढी वारीही विना पावसाची पिंपरी चिंचवड पुणे शहरातून निघून गेली. त्यानंतर राज्यातील जनता आणि बळीराजा चिंताग्रस्त असताना जूनच्या शेवटच्या आठवड्यात वरूण राजाने आगमन करत नागरिकांना सुखद धक्का दिला आहे.




