लोणावळा : लोणावळ्यातील मान्सून लेक येथील बंगल्यात घरफोडी; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मान्सून लेक येथील बंगल्यात 21 जून ते 26 जून दरम्यान घरफोडी झाली असून यामध्ये तब्बल सव्वापाच लाख रुपयांचे सोने व डायमंडचा ऐवज चोरीला गेला आहे.
याप्रकरणी राजेंद्र जयकिसन मगनलाल (वय 58 वर्षे व्यवसाय व्यापार रा. मन्सून कॉटेज बंगला नं. 2 नौसेना बाग लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवि कलम 380, 454, 457 प्रमाणे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र मगनलाल यांच्या मान्सून लेक येथील बंगल्यात अज्ञात चोरट्याने बेडरुमची खिडकी कशाने तरी खोलून बंगल्यात प्रवेश करत 3 लाख 40 हजार रुपये किंमतींच्या सहा चैनी व त्यांना असलेले सोन्याचे पेंडल, 1 लाख रुपये किंमतीची डायमंड ची अंगटी, 45 हजार रुपये किंमतीची इमरलड कंपनीची हिरव्या धातुची कर्णफुले, 40 हजार रुपये किंमतीचे दोन सोन्याचे पेंडल असा एकूण 5 लाख 25 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने पळविला आहे. आज सकाळी ही घरफोडी झाल्याची माहिती समजताच लोणावळा शहर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे श्वानपथक पाचारण करत चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असून तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले आहे.
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर पुढील तपास करत आहेत.




