पिंपरी : पूर्णानगर चिंचवड येथे नव्याने विकसित झालेल्या सिमेंट रोडवरती गतिरोधक बसवण्यासाठी पूर्णा नगर कृती समितीने वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी आरटीओ कडून महापालिकेला गतिरोधक बसवण्याचे पत्र देऊन चार महिने उलटले तरीही महापालिकेला अद्याप जाग येत नाही. त्यामुळे महापालिकेत तातडीने गतिरोधक तयार न केल्यास मुरूम भरलेले टँकर आणून रस्त्यावर ओतणार असा इशारा पूर्णानगर कृती समितीचे अध्यक्ष विकास गर्गे यांनी दिला आहे.
पूर्णानगर परिसरात महापालिकेकडून डांबरी रस्ते उकरून सिमेंटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. मात्र, या भागात गतिरोधक नसल्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालक गाड्या सुसाट वेगाने घेऊन जात आहेत. यामुळे लहान मोठे अपघातही घडले असताना महापालिकेने मागील नऊ महिन्यापासून गतिरोधक तयार केला नाही. यासाठी पूर्णानगर विकास कृती समितीकडून वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. गतिरोधक बसवण्यासाठी आरटीओ कडून महापालिकेला पत्र देऊन चार महिने उलटले तरीही महापालिकेला अद्याप जागा आली नाही. त्यामुळे तातडीने गतिरोधक तयार न केल्यास मुरबाने भरलेले डंपर रस्त्यावरती टाकून गतिरोधक उभारू असा इशारा विकास गर्गे यांनी महापालिकेला दिला आहे.




