पिंपरी : राज्यातील सत्ता संघर्ष नंतर शिंदे व फडणवीस सरकार सत्तेत आली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन ४८ झाली कंबर कसली आहे. यामध्ये मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे फडणवीस यांच्यासोबत आले त्याचबरोबर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही येथे सरकारसोबत आले आहेत. त्यातच आज आम्ही लोकसभेसाठी भाजपने दोन्हीही लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत असताना शिरूर लोकसभेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शून्य गटासाठी मावळ लोकसभा सोडून शिरूर लोकसभेवर भाजप दावा सांगणार असे चित्र दिसत आहे.
अनेक वर्षानंतर शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाचा खासदार निवडून आणला आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत विरोधी पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तर राष्ट्रवादीला या मतदारसंघात ठाण मांडू न देता शिरूरचा गड जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. पण उमेदवारीवरून भाजपचे आमदार महेश लांडगे व शिंदे गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने इच्छुक माजी आमदार विलास लांडे यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान पक्षापुढे आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. परंतु गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर ते पुन्हा दावा करीत आहेत. परंतु भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढविण्यास तयार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांची या लोकसभेच्या समन्वयकपदी निवडही केली. त्यामुळे शिंदे गटाचे आढळराव पाटील व भाजपचे महेश लांडगे यापैकी कोणाला संधी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. तरीही भाजपकडून लांडगे यांनी शिरुरचे समन्वयक म्हणून मतदारसंघात बैठका व संघटनाला सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारीवरून भाजप- शिंदे गटात रस्सीखेच दिसून येते. शेवटी या शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप आपल्याच ताब्यात घेणार असल्याचे चित्र सध्या तर दिसत आहे. त्यामुळे पुन्हा लोकसभा मैदानात उतरण्याचा निर्धार केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पदरी निराशाच येणार का हेच पाहावे लागणार आहे.




