पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीमंडळाच्या विस्तारात संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ११) अजित पवार यांना मुंबईत जाऊन भेटले.
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना मानणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस माजी नगरसेवक, सर्व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




