राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची पिंपरी- चिंचवड शहराची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली. नऊ जणांचा कार्यकारी समितीत समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शहर कार्यकारिणीने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्या गटात कोणीही पदाधिकारी राहिले नव्हते. त्यानंतर आज शरद पवार गटाची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी आज जाहीर केली. या कार्यकारिणीवर सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर, शिला भोंडवे या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




