
नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांनी सोमवारी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एनडीएच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
चिराग पासवान यांना एनडीएच्या बैठकीला येण्याचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र त्यासाठी चिराग पासवान यांनी काही अटी घातल्या आहेत. 2019 प्रमाणे लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेची एक जागा द्याव्या, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली.
अमित शहा आणि चिराग पासवान यांच्यात सुमारे 15 मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर लोजप (रामविलास)चे बिहार अध्यक्ष राजू तिवारी म्हणाले, “चर्चा खूप चांगल्या वातावरणात झाली. चर्चा सकारात्मक वातावरणात झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. हाजीपूर जागेबाबत राजू तिवारी म्हणाले की, चिराग पासवान यांनी यापूर्वीच हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. पशुपती पारस यांच्या दाव्यावर ते म्हणाले, “कोण काय म्हणतंय? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही




