पिंपरी-चिंचवड आणि मावळ वासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात केवळ 25 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो.
महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
धरणातील पाण्याची परिस्थिती!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 25 मिली मीटर
# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 736 मिली मीटर
# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 660 मिली मीटर
# धरणातील सध्याचा पाणी साठा – 30.43 टक्के
# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 62.91टक्के
# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 1.00 टक्के
# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 15.53 टक्के




