पिंपरी, दि. १७ जुलै :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी ऑल आऊट कोम्बिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सो यांनी समक्ष हजर राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत (दि. १६) रोजी रात्री ११:०० ते (दि. १७) रोजी ४:०० पर्यंत ऑल आऊट ऑपरेशन कोम्बींग व नाकाबंदी नेमण्यात आली होती.
या कारवाई दरम्यान पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील परिमंडळ -०१, पोलीस उप-आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे परिमंडळ ०२, सर्व सहा पोलीस आयुक्त तसेच सर्व पो स्टे प्रभारी अधिकारी व अमलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार अशा एकुण ११३ पोलीस अधिकारी, ४९६ पोलीस अंमलदार हे सहभागी होवुन नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन दरम्यान कारवाई केली आहे.
नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी चेक ५३६, आर्म अॅक्ट प्रमाणे १४ कारवाई करुन त्यामध्ये १२ कोयते, ०२ सुरे असे एकूण १४ हत्यारे जप्त केले, १४ आरोपीवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. एनडीपीएस अॅक्ट कलम ०१ कारवाई (०४ किलो ०६ तडीपार १०० ग्रॅम गांजा) करण्यात आलेली असून एका आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हिस्ट्रीसिटर चेक केले १२२, अटक पाहिजे आरोपी ४५, एन.बी. डब्ल्यु वॉरंट ८, बी. डब्ल्यु वॉरंट ५ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत ७ कारवाई करण्यात आलेल्या आहेत. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहने २९६४ चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे १४४ वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. हॉटेल/लॉज चेक १२६, संशयीत इसम चेक १२२, संशयीत वाहेन ताब्यात ६६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ प्रमाणे ०१, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे ०५ याप्रमाणे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे.




