
पिंपरी, दि. १७ जुलै :- जगताप डेअरी जवळ सांगवीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कडेला अंधारात काही इसम संशयीतरित्या उभे आहेत, अशी बातमी वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांना घटनास्थळी अंधारात काही इसम संशयीतरीत्या थांबलेले दिसले. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच ते पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु एक इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.
वेंकटेश सुरेश नाईक (वय २४ वर्षे रा. राजवाडेनगर, जयहिंद कॉलनी, काळेवाडी), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३ वर्षे रा. ओंकार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), शेखर काळुराम जांबुरे (वय १९ वर्षे रा. भारत कॉलनी नढेनगर काळेवाडी), एक विधीसंघर्षग्रस्त बालक, अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणारे आय.टी. कंपनीत काम करणारे नोकरदार, मोटार सायकल वरून एकटे प्रवास करणाऱ्यांना अडवुन त्यांच्याकडच्या मोल्यवान वस्तु काढुन घेण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. पकडलेल्या ०४ जणांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ०१ तलवार, ०२ धारदार कोयते, मिरची पुड असे सापडले आहे. आरोपींविरुध्द गु. रजि.नं.६६६ / २०२३ भादविक ३९९, आर्म अॅक्ट ४,२५, महा.पो.का. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील वेंकटेश नाईक हा सराईत गुन्हेगार असुन वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत. पाहिजे आरोपी याचा शोध सुरू आहे. आरोप यांनी जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत अगर कसे या अनुषंगाने तपास सुरू असून आरोपींची (दि. १७) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झाली आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे सह.पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि-२, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि.संतोष पाटील, पोउपनि निबांळकर, पोउपनि चव्हाण, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. विनायक घारगे, पोशि. २३६९ व्हरकटे, पोशि. २५५७ कदम, पोशि. ३१५९ जाधव, होमगार्ड के.सी. घुगे यांनी मिळुन केली आहे.




