
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने मणिपूर येथील झालेल्या घटनेचा सोमवारी (दि. २४) जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्षा अॅड. जयश्री कुटे, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुशील मंचरकर, माजी सचिव अॅड. सुजाता बिडकर, अॅड. संगीता परब, अॅड. मनीषा महाजन, अॅड. पूनम राऊत यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी अॅड. उमेश खंदार, अॅड. गजेंद्र तायडे, अॅड. मेरी रणपिसे, अॅड. धनंजय कोकणे, अॅड. साठे, सचिव अॅड. गणेश शिंदे, ऑडिटर अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. सौरभ जगताप, सदस्य अॅड. प्रशांत यांच्यासह पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोशिएशनचे आजी माजी पदाधिकारी, व इतर सहकारी वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते.




