कोणाच्या नादाला लागतो माहिती आहे का म्हणत एकाला घरात घुसून नऊ जणांनी मारहाण केली आहे. हा प्रकार मंगळवारी(दि.24) रात्री पिंपरीतील रमाबाई नगर येथे घडला.
याप्रकरणी जखमीच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून दादासाहेब साबळे (वय 40) जय गायकवाड (वय 27) रोहित प्रक्षाळे (वय 28), दीपक बनसोडे (वय 28), अरविंद साबळे (वय 37) व चार महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे घरी असताना दादा साबळे त्यांच्या घरात आला. त्याने फिर्यादीच्या पतीस तू कोणाच्या नादी लागतो तुला माहिती आहे का तुला गल्लीत राहणे मुश्किल करून टाकीन, अशी धमकी दिली.
त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली आरोपी पाठिमागे त्याचे इतर नातेवाईक ही घरात आले. त्यांनी फिर्यादी यांची सासू,पती, भाऊ यांना देखील लाथा बुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.




