
पिंपरी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पिंपरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिक अशा ११२३ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेवून रक्तदान केले.
कार्यक्रमास विनायक राऊत (खासदार, प्रवक्ते), सचिन अहिर (मा.मंत्री, संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), रवींद्र मिर्लेकर (उपनेते), माजी आमदार गौतम चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख), लतिका पाष्टे (महिला संपर्क पमुख), शहरप्रमुख सचिन भोसले, सुलभाताई उबाळे (जिल्हा संघटिक),शैला खंडागळे (जिल्हा संघटिका), केसरीनाथ पाटील (भोसरी व पिंपरी संपर्कप्रमुख), दिलीप घोडेकर (चिंचवड संपर्कप्रमुख), अशोक वाळके (पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी), योगेश बाबर (मा. शहर प्रमुख), सचिन सानप (युवा जिल्हाप्रमुख), संजय दुर्गुळे (मा. नगरसेवक), राम पात्रे (मा. नगरसेवक), रेखा दर्शिले (मा. नगरसेविका), रवी खिल्लारे (मा. नगरसेवक), महादेव गव्हाणे (मा. नगरसेवक) आदी उपस्थित होते.
विनायक राऊत (खासदार), सचिन आहिर, रविंद्र मिर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भव्य प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.




