खुन्नस का दिली म्हणत तीन अल्पवयीन मुलांनी एका 19 वर्षीय तरुणाला काचेच्या बाटलीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.24) दुपारी पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी लखन कृष्णात गुरसाळे (वय 19, रा .काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रासह दुचाकीवरून जात होते. यावेळी मुलांनी त्यांना हाक मारून थांबवले. फिर्यादी व त्यांचा मित्र तिथे थांबले असता तीनही अल्पवयीन मुले तेथे आली. त्यांनी तू आम्हाला पाहून खुन्नस का देतोस व कारण नसताना भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवीगाळ दमदाटी करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व बियरच्या बॉटलने मारहाण करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




