
पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर येथे सुरु असलेल्या नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. गेली 2 वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना 22 डिसेंबर 2022 रोजी 18 महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत.
तसेच या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याकामी मे.ओएस असीस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामाकरिता नेमणूक करण्यात आलेली आहे.




