पिंपरी, दि. २७ जुलै :- कामगारांना मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. अजय शंकर शर्मा (वय- १९ वर्षे, रा. बिजलीनगर, चिंचवड), तीन विधिसंघर्षित बालक यांना गुन्हे शाखा युनिट-४ च्या पोलीस पथकाने बिजलीनगर चिंचवड, भोंडवे वस्ती रावेत, भिमा कॉलनी, रावेत अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुर हा (दि. २३) रोजी सायंकाळी ०७:४५ वाजण्याच्या सुमारास डांगे चौकातुन कामावरुन पायी घरी जात होता. ताथवडे रोड, डांगे चौका जवळ दोन बाईकवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी त्याला अडवुन धमकावुन व मारहाण करुन तसेच चाकुने गंभीर दुखापत करून त्याच्या जवळील दहा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी करून आरोपी पळुन गेले. वाकड पोलीस स्टेशन गु.र.नंबर- ७१२/२०२३ भा.द.वि. कलम ३९४,३२३, ५०४,३४ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे गुन्हा नोंद होता. गुन्हे शाखा युनिट-४ चे सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर यांचे एक पथक व दरोडा विरोधी पथकाचे सपोनि अंबरिष देशमुख यांचे दुसरे पथक अशी दोन पथके तयार केली.
आरोपी डांगे चौकतुन रावेतच्या दिशेने गेलेल्या परिसरातील ६० ते ७० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा प्राप्त सी. सी. टी. व्ही मधुन सदरचा गुन्हा हा दोन मोटारसायकलवर आलेल्या एकुण ०६ आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तयार केलेल्या दोन्ही पथकांनी सी. सी. टी. व्ही फुटेज व्दारा व बातमीदारों मार्फत सहा आरोपींची नावे निष्पन्न केली. नंतर (दि. २६) रोजी त्यातील पथकांनी आरोपी अजय व तीघा वि.स. बालक यांना ताब्यात घेवुन तपास केला असता आरोपींनी पाहिजे साथिदार सौरभ संतोष आरगळे (रा-रुपीनगर, निगडी) व मुकेश गुप्ता (रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्यासह सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच आरोपी व वि.सं.बालक यांना ताब्यात घेते वेळी त्यांचे कडे अशा प्रकारे चोरी केलेले परंतु गुन्हे दाखल नसलेले ०३ मोबाईल फोन मिळुन आले असुन एका इसमास धमकावून व मारहाण करून लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन अधिक तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मॅट्रीक सेक्युरिटी अॅन्ड सव्हेलन्स प्रा.लि कंपनीचे सी. सी. टीव्ही फुटेजचा महत्वाचा उपयोग झाला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उपआयुक्त, मुख्यालय / गुन्हे स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने सो, मा. श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम सपोनि अंबरिष देशमुख, तसेच गुन्हे शाखा युनिट ४ चे सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरनाळे, पोहवा / प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच दरोडा विरोधी पथकाचे सपोउपनि महेश खांडे, पोहवा / नितीन लोखंडे, पोना/गणेश हिंगे, आशिष बनकर, पोशि/ समिर रासकर, आबा कदम, गणेश सावंत, सुमित देवकर कांबळे, पोशि/तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा / नागेश माळी, पोशि/ पोपट हुलगे यांनी केली आहे.




