पिंपरी , २७ जुलै :- जबरी चोरीच्या उददेशाने तयारीत असतांना फिर्यादीला पाहुन आरोपी टपरीच्या आड लपले. फिर्यादी हे शासकीय कर्तव्यावर बजावत असताना पोलीस स्टाफसह त्यांच्याकडे चौकशीसाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीच्या डोळयात मिरची स्प्रे मारून त्यांना किरकोळ दुखापत केली. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींच्या झडतीमध्ये बनावट प्लॅस्टीकची पिस्टल मिरची स्प्रे व स्क्रू ड्रायव्हर जवळ मिळुन आला आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी ००.१५ च्या सुमारास मेदनकरवाडी परीसरातील पुणे नाशिक हायवे, बंगला वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील टपरीजवळ घडला. फिर्यादी अमोल रमेश डेरे (पोलीस उप निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन) यांनी आरोपी निहाल हरपाल सिंग (वय ३५ वर्षे, रा. मुंबई), मंगेश लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे, रा. राहटणी), संजय पडवळ (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलीस ठाण्यात ६२४ / २०२३ भा.दं.वि कलम ३५३,३३२, ३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि ज-हाड हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.




