
ठाणे जिल्ह्यात आज पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून रस्ते वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन यंत्रणा कोलमडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. संभाव्य पावसाचा धोका ओळखून ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात अतिवृष्टीच्या शक्यतेच्या अनुषंगाने #ठाणे जिल्ह्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २८ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.@ceozpthane pic.twitter.com/zY7AQot6Ha
— DISTRICT INFORMATION OFFICE, THANE (@Info_Thane1) July 27, 2023
जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याबाबतचे आदेश ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यानुसार उद्या दि. २८ जून २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.



