र्डिंग दिसत नसल्याने सोसायटी समोरील पाच झाडे तोडली. याप्रकरणी होर्डिंग मालक आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 जुलै रोजी रात्री बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली. महापालिकेच्या उद्यान विभागातील सुहास सामसे यांनी सोमवारी (दि. 31) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी मोशी (Moshi) येथील रॉयल पाम सोसायटी समोर असलेले पिंपळाचे झाड, तसेच रस्त्याच्या बाजूला ट्री गार्डमध्ये लावलेली चार झाडे अज्ञातांनी तोडली. सोसायटी समोर लावलेला साईराज पब्लिसिटीचा होर्डिंग झाडांमुळे लोकांना दिसत नसल्याने ही झाडे तोडण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.




