पुणे ; आज पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमास सोहळ्यात स्टेजवरती सुरुवातीलाच उपस्थित असणारे शरद पवारांना अनेक मान्यवरांनी भेटून हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी अजित पवार यांनी त्यांच्यासमोर जाण्याचे टाळले. या घटनेची महाराष्ट्रात अनेक चर्चा रंगल्या याचे स्पष्टीकरण खुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.
व्यासपीठावर घडलेल्या या घटनाक्रमानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या पाठीमागून गुपचूप निघून का गेलो? याचं उत्तर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे. शरद पवारांचा आदर करतो, त्यामुळे भीतीपोटी मी पाठीमागून निघून गेलो, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच सार्वजानिक कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. दोन्ही नेते जवळपास ७५ मिनिटं या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अजित पवार वगळता सर्वच नेत्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी करत संवाद साधला. मात्र, अजित पवारांनी नजरेला नजरही भिडवली नाही. शिवाय हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार गुपचूपणे शरद पवारांच्या पाठीमागून निघून गेले.



