
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयच्या (ITI) 37 प्रशिक्षणार्थींना बडवे ॲटोकॉम्प प्रायव्हेट लिमिटेड चाकण एमआयडीसीमध्ये ओजेटी (OJT) प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे.
बडवे ॲटोकॉम्पसमध्ये ओजेटी(OJT) प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणास आज सुरुवात झाली. त्यावेळी संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, बडवे ऑटोकॉम्पचे एचआर हेड चंद्रकांत घुले, सतीश गायकवाड, आयटीआयचे गटनिदेशक मनोज ढेरंगे, निदेशक योगेश गरड, गणेश सुर्वे, शहाजी ताटे, भानुदास दुधाळ हे उपस्थित होते.
प्राचार्य पाटील यांनी कंपनीतील सुरक्षा नियमांबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी वेल्डर 26, शीटमेटल वर्कर 5 व पेंटर जनरल 6 असे एकूण 37 प्रशिक्षणार्थी संस्थेमार्फत पाठविण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मासिक विद्यावेतनासोबत कॅन्टीन व वाहतुक सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत काम करण्याची संधी मिळणार असल्याने कंपनीतील सुरक्षितता शिस्त व अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये अप्रेंटीसशीप साठी निवड झालेल्या उमेदवारांना त्याच कंपनीत अप्रेंटिसशिप मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ओजेटी (OJT) मिळण्याकरिता संबंधित सर्व निदेशक व गटनिदेशक यांनी प्रयत्न केले.



