
मुंबईमधील एका नामांकित महाविद्यालयात मुलींच्या बुरखा घालून येण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी असंतोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाचे पडसाद उमटल्यावर महाविद्यालयाने हा निर्णय मागे घेतला.
मुंबईतील चेंबूरमध्ये एक घटना समोर आली होती. चेंबूरमधील आचार्य आणि डी.के मराठे कॉलेजमध्ये बुरख्या घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम विद्यार्थींनींनी आंदोलन केलं होतं.
समाज माध्यमांवर एक व्हिडीयो व्हायरल झाला होता, ज्यात बुरखा घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महाविद्यालयाला गणवेश बंधनकारक आहे. मात्र, आता महाविद्यालयाने हा निर्णय मागे घेतला आहे.



