
पिंपरी :- पिंपळे सौदागर येथील वै हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक काटे म्हणाले, लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचेही साहित्य परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.
यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी मनोगतातून टिळक आणि साठे यांच्या कार्याचा आढवा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेशना चक्रबर्ती यांनी केले. तर आभार सुवर्णा धातरक यांनी मानले.




