नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. पक्षाच्या वतीने राज्याच्या स्थितीबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधीही सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधातच विजय झाला असल्याने नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप टाळावेत, असं राहुल गांधी यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांना सूचित केले.
ष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. जनतेला दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तसेच 2024 च्या विजयासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल, ज्या भागात जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्यावर त्या भागातील विजयी कामगिरीची जबाबदारी असेल, असही स्पष्ट करण्यात आलं.




