पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान अमित शहा यांचा उद्या (रविवार) पिंपरी चिंचवड दौरा देखील असणार आहे. परिणामी चिंचवडमधील वाहतुकीत पोलिस प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.
रविवारी अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे चिंचवड येथील वाहतुकीत बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले नागरिकांनी वाहतुकीच्या बदलाची नाेंद घ्यावी तसेच पाेलिस दलास सहकार्य करावे.
जाणून घ्या वाहतुकीतल बदल
महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.
पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे असेही (traffic) पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.



