पुणे : राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई , पिंपरी चिंचवड, नाशिक अशा 7 मुदत संपलेल्या सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्हाला हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला निवडणूक पाहिजे. आम्ही (भाजप) कुठल्याही निवडणुका थांबवलेल्या नाहीत सर्व मिळून निवडणूक घेण्याची मागणी आयोगाकडे करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र न फडणवीस यांनी विरोधकांना विधानसभा अधिवेशनात स्पष्ट केले होते.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचे दौरे केल्याने ही तयारी लोकसभेसाठी की महापालिकेसाठी ? अशी चर्चा रंगली आहे. ऑक्टोबरमध्ये महापालिकेच्या निवडणुकाही होऊ शकतील, असेही चर्चा पुन्हा फुटू लागली आहेत.
विरोधकांकडून प्रशासक नेमणुकीचा मुद्दा…..
महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. यावरून विरोधक वारंवार सत्ताधारी सरकारवर महापालिका निवडणुका रखडल्याचा आरोप करीत आहे. सात-आठ महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला कोणतीही रिस्क नको आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता राजकीय स्थिती भाजपसाठी सध्या चांगली आहे. त्यातच शिंदे गट, अजित पवार गटही भाजप सोबत आहे.
- अमित शहा सोबत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री याच्या विशेष बैठकीची चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शाह यांची जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलात विशेष भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. राज्यातील राजकीय घडामोडींसह रेंगाळलेली महापालिका निवडणूक आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.




